नागपूर : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे अभियान सुरु झालेय. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्याच सामन्यात भारताला ४७ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धचा सामन्यातील पराभव आणि या मैदानावरील पराभव याचा २००७ आणि २०११मधील वर्ल्डकपशी खोलवर संबंध आहे. हा संबंध पुन्हा खरा ठरल्यास भारताला यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची शक्यता अधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २००७मधील पहिल्या वर्ल्डकपमध्ये संपूर्ण स्पर्धेत भारताने केवळ एकच सामना गमावला होता तोही न्यूझीलंडविरुद्ध. या वर्ल्डकपमध्येही भारताची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने झाली आणि भारत हा सामना हरला. न्यूझीलंविरुद्धचा पराभव २००७मध्ये भारतासाठी लकी ठरला होता. यावेळीही असे झाल्यास भारताचे दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 


कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११मध्ये तब्बल २८ वर्षांनी आयसीसी वर्ल्डकप जिंकला होता. या पूर्ण स्पर्धेत भारताने नागपूरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पराभव पत्करला होता. २०११ मध्ये नागपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने गमावला होता. या वर्ल्डकपमध्येही भारताने नागपुरच्या मैदानावर सामना गमावला. २०११ प्रमाणेच यंदाही हा पराभव भारतासाठी लकी ठरल्यास भारत वर्ल्डकप जिंकू शकतो.