आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही देशांच्या हॉकी टीममध्ये हा मुकाबला रंगणार आहे.
नवी दिल्ली : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही देशांच्या हॉकी टीममध्ये हा मुकाबला रंगणार आहे.
पाकिस्तानी हॉकी टीमचे कोच ख्वाजा जुनैद यांच्यामते हा सामना चुरशीचा होणार आहे. जुनैद यांच्या मते भारत आणि पाक यांच्यातील सामना नेहमी भावनात्मक राहिलाय. यावेळी पाकिस्तानचा संघ आक्रमक प्रदर्शन करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात जपानला 10-2 असे पराभूत करत विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोरियासोबत भारताला 1-1 अशी बरोबरी स्वीकारावी लागली.
सामन्याची वेळ : चार वाजता