मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी -२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा ४ वेळा लढत झाली आहे. या चारही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारलेय. आता या दोन्ही संघांमधील ५ सामना १९ मार्चला कोलकातात होत आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.


न्यूझीलंडकडून टीम इंडिया ५ वेळा हरली आहे. मात्र, असे असले तरी पाकिस्तानविरोधात टीम इंडिया नेहमीच चांगली खेळत आहेत. हे टीमच्या फेव्हरमध्ये आहे. 


याबाबतच्या कारणांचा खुलासा काही माजी क्रिकेटपटू करताना दिसतात. त्यांनी सांगितलेल्या कारणांपैकी प्रमुख ही ५ कारणे.


काय आहेत कारणे?


१. पाक खेळाडू नेहमी सचिन, द्रविड, सेहवाग, सौरभ, लक्ष्मण या खेळाडूंना घाबरतात. आता यात भर पडली आहे ती रोहित, विराट, धोनी, रैना आणि युवराज या नावांची. यांना कशी बॉलिंग करायच्या या विचाराने पाकिस्तानी बॉलर्स घाबरतात. कारण हे मोठे हिटर आहेत.


२. सामना सुरु होताना खूप चर्चा होती ती क्रिकेट युद्धाचीच. पाक खेळाडू मानसिक दबाव झेलण्यास कमी पडतात पाकमध्ये आंतरराष्ट्रीय सामने त्या मानाने कमी होतात.


३. दबावामुळे सुरुवात चांगली होत नाही. आणि शेवटच्या षटकात नियंत्रण राखण्यास अपयश येते. म्हणजेच ओपनिंग आणि डेथ ओव्हरमध्ये अपयश येते. पाकचे ३ टॉप बॅट्समन आहेत. मात्र त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. 
 
४. दबावामुळे टार्गेटचा पाठलाग करता येत नाही. तसेच त्यांना टार्गेटचा दाबव झेलता येत नाही. आतापर्यंत पाकिस्ताने ४९ सामन्यापैकी २२ वेळा हार पत्करावी लागली आहे. तर टीम इंडिया १२ वेळा हरलाय. तर आधी बॅटिंग करताना ५४ पैकी १८ तर टीम इंडिया १४ सामने गामावलेत.
 
५. बॉलिंग रिलायबल पण बॅटिंगमध्ये करावा लागतो स्ट्रगल आमीर, रियाज, इरफान आणि आफ्रिदी असल्याने बॉलरची धार आहे. मात्र, बॅटिंगमध्ये पाककडे आफ्रिदी वगळता दमदार खेळाडू नाही. सध्या आफ्रिदी अपयशी ठरत आहे.