सुरुवातीच्या पडझडीनंतर टीम इंडिया सावरली
सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिस-या टेस्टमध्ये पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया सावरलीय. सेंट ल्युशिया टेस्टच्या पहिल्या दिवस अखेर टीम इंडियाने 5 बाद 234 इतकी मजल मारलीय.
ग्रॉस इस्लेट : सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिस-या टेस्टमध्ये पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया सावरलीय. सेंट ल्युशिया टेस्टच्या पहिल्या दिवस अखेर टीम इंडियाने 5 बाद 234 इतकी मजल मारलीय.
दिवसअखेर आर.अश्विन 75 तर वृद्धीमान साहा 46 धावांवर नाबाद आहेत.. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून कोहली ब्रिगेडला फलंदाजीचं निमंत्रण दिलं.
शिखर धवन आणि विराट कोहली झटपट बाद झाल्यानंतर सलामीवीर लोकेश राहुलनं 50 रन्सची इनिंग खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चेसच्या गोलंदाजीवर तो आपली विकेट गमावून बसला.
त्यानंतर अजिंक्य रहाणे, रोहित शर्माही फारशी चमक दाखवू शकले नाही. दिवस अखेर 108 धावांची भागीदारी करत अश्विन आणि साहा नाबाद आहेत.