मीरपूर : पाकिस्तानने भारतासमोर ठेवलेल्या ८४ धावांचा लक्ष्य गाठतांना भारतीय संघ देखील सुरुवातील अडचणीत आला. भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला तर त्याच्या पाठोपाठ रहाणे आणि रैना हे देखील विशेष काही करु शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तान विरोधात खेळ सांभाळत ७१ चेंडूत ४९ धावा केल्या ज्यामुळे भारताला विजय मिळवणं शक्य झालं. भारताने १५.३ ओव्हरमध्ये ५ गडी गमावत ८५ धावा केल्या आणि विजय मिळवला. 


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पाकिस्तान संघाला केवळ ८३ धावांमध्ये तंबूत पाठवलं. पाकिस्तानने १७.३ षटकात सर्वबाद ८३ धावा केल्या. 


भारताकडून अशिष नेहरा, जशप्रित बुमराह, युवराज सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट तर  रविंद्र जडेजा याने 2 आणि हार्दिक पांडयाने ३ विकेट्स घेतल्या. पाकविरूद्धचा विजय भारताने आजही कायम राखला.