मुंबई : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा १५ मार्चला न्यूझिलंडसोबत होणार आहे. आयसीसी वर्ल्डकपचं आयोजन या वर्षी भारतात होणार आहे. २०११ प्रमाणे भारत पुन्हा वर्ल्डकप जिंकू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ कारणांमुळे भारत वर्ल्डकप जिंकणार


१. टीममध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंची कमी नाही. शिवाय प्रत्येकामध्ये एकमेकांना सहयोग करणं फार चांगल्या प्रकारे जमतं. पवन नेगी या नव्या खेळाडूला टीममध्ये सहभागी करण्यात आला आहे.   युवराज सिंग, हरभजन सिंग आणि आशिष नेहरा या अनुभवी खेळाडूंचं देखील टीममध्ये कमबॅक झालं आहे.


२. काही मागच्या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे धोनीच्या कॅप्टनसीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण ऑस्ट्रेलिया विरोधातील ३ टी-२० सामन्यात जुना धोना परतला आहे. असं दिसतंय. धोनीने या आधी देखील २ वेळा वर्ल्डकर जिंकूण दिला आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनुभवाची कमी नाही.


३. २०१६ च्या वर्ल्डकप भारतात होणार असल्याने होम ग्राऊंडवर देखील क्रिकेट फॅन्सचा पूर्ण सपोर्ट असेल. होम ग्राऊंडवर खेळणे हा देखील प्लस पाँईट असतो. त्यामुळे भारताला स्वत:च्या ग्राऊंडवर खेळतांना काही अडचणी येणार नाहीत. 


४. भारताकडे दोन सर्वाधित हुशार स्पिनर आहेत. अश्विन आणि जडेजा हे कोणत्याही टीमला परास्त करण्यासाठी तत्पर आहेत. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शिवाह जसप्रीत बुमराह हा देखील त्याची जादू दाखवू शकतो. आशिष नेहरा आणि शम्मी हे दोघे चांगला ऑप्शन आहे. 


५. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य राहणे, सुरेश रैना, धोनी, युवराज सिंग हे दिग्गज फलंदाज टीममध्ये आहे. शिवाय हार्दीक पांड्या, अश्विन हे देखील चांगला खेळ दाखवतील. त्यामुळे सगळ्या फळीमध्ये चांगले फंलदाज असल्याने भारतीय टीम मजबूत स्थितीत आहे.