बंगळूरु : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतलाय. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर या कसोटीत भारताने टॉस जिंकत संघात दोन मोठे बदल केलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिशतकवीर करुण नायरला पुन्हा संघात स्थान देण्यात आलेय. त्याला जयंत यादवच्या जागी संधी देण्यात आलीये. दरम्यान खांद्याच्या दुखापतीमुळे मुरली विजय संघाबाहेर असून त्याच्या जागी अभिनव मुकुंदला स्थान देण्यात आले. 


दरम्यान, बंगळूरुची खेळपट्टी भारतीय संघासाठी अनुकूल समजली जातेय.  सुरुवातीचे दोन दिवस फलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली राहिल. तर तिसऱ्या दिवशी स्पिनर्सला खेळपट्टीची मदत होईल. त्यामुळे भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतासाठी नक्कीच चांगला संकेत असेल.