मोहाली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्याच दिवशी भारताने विजय मिळवलाय. आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयवंत यादव या त्रिकुटाच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशीच सामना खिशात घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डावात भारतासमोर विजयासाठी अवघे 103 धावांचे आव्हान होते. हे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले आणि सलग दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला. 


या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-0ने आघाडीवर आहे. वृद्धिमन साहाच्या जागी संधी मिळालेल्या पार्थिव पटेलने दुसऱ्या डावात 67 धावांची नाबाद खेळी केली.