कानपूर : भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 टेस्ट मॅचच्या या सीरीजमध्ये भारत न्यू़जीलंडपेक्षा आता 1-0 ने पुढे आहे. टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली. गोलंदाजांच्या जोरावर भारताने हा सामना आपल्या खिशात घातलाय


पाकिस्तानी क्रिकेट टीम आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये काही दिवसांपूर्वी अव्वल झाली होती. भारताने आजच्या विजयानंतर पहिलं स्थान पाकिस्तानकडून हिसकावून घेतला आहे.
पाकिस्तान 111 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रँकिंग ही सीरिज संपल्यानंतरच ठरेल. पण अंकानुसार तरी भारत आता पहिल्या स्थानावर आला आहे.


भारत जर कोलकाता टेस्टमध्ये ही विजय मिळवतो तर भारताचे गुण 113 होतील. पाकिस्तान पुढची टेस्ट सिरीज वेस्टइंडीज विरोधात खेळणार आहे. पाकिस्तानने ती सिरीज ३-० ने जिंकली तरी त्यांचे 112 अंक होतील. अशा प्रकारे भारत पहिल्या स्थानावर झेप घेणार आहे.