चेन्नई : तिस-या दिवसअखेर टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर पकड मजबूत केली आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं 4 बाद 391 अशी मजल मारली आहे. तिस-या दिवसाच्या खेळाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारताचा ओपनर लोकेश राहुलची दमदार खेळी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकेशनं करियरमधली चौथी सेंच्युरी झळकावली. त्यानंतर त्यानं आपलं दीडशतकही पूर्ण केलं. आक्रमक आणि बहारदार खेळीमुळे लोकेश डबल सेंच्युरी पूर्ण करणार असं वाटत होतं. त्याचवेळी 199 रन्सवर तो आऊट झाला. आदिल रशीदनं त्याची विकेट घेतली. लोकेश राहुलची डबल सेंच्युरी अवघ्या 1 रननं हुकली.


71 रन्सची खेळी करणारा पार्थिव पटेल आणि करियरची पहिली हाफसेंच्युरी झळकावणा-या करुण नायरची चांगली साथ लोकेशला लाभली. पुजारा आणि कोहली मात्र या इनिंगमध्ये मोठी खेळी करु शकले नाहीत. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी करुण नायर 71 तर मुरली विजय 17 रन्सवर नॉट आऊट आहेत.


भारत अजूनही इंग्लंडच्या पहिल्या इनिंगच्या स्कोरपासून 86 रन्स पिछाडीवर आहे. पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेऊन इंग्लंडला बॅटिंगसाठी पाचारण करण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया चौथ्या दिवशी मैदानात उतरेल.