नवी दिल्ली : न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार आहे. इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट. तीन वनडे आणि दो टी20 च्या सामन्यांसाठी येणार आहे. या सिरीजसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.


युवराज सिंगला मिळणार संधी ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजीमध्ये युवराज सिंगने खूप चांगली कामगिरी केली. या सीजनमध्ये त्याने एक शतक आणि एक दुहेरी शतक ठोकत त्याचा फॉर्म दाखवून दिला. युवराजने या सीजनमध्ये ४ सामन्यांमध्ये 587 रन  केले. ज्यामध्ये त्याची  83.85 स्ट्राइक रेट ८३.८५ होती. ज्यामध्ये २ शतक आणि एक अर्धशतक आहे.


युवराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २६० रन्सची सर्वाधिक खेळी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याचं हे पहिलं दुहेरी शतक आहे. त्याची स्पिंग बॉलिंग त्याचा बाजू इंग्लंड विरोधात आणखी मजबूत करते.


गौतम गंभीरचं नाव चर्चेत


दुसरीकडे दिलीप ट्रॉफीमध्ये दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने 147 रन करत मोठा शतक ठोकलं होतं. या शतक नंतर त्याची बाजू देखील मजबूत झाली आहे. के.एल राहुल आणि शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर आहेत त्यामुळे गौतमला शेवटच्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेवनमध्ये जागा मिळाली होती. राहुल आणि धवनने घरच्या मैदानावर एकही टेस्ट नाही खेळली त्यामुळे गौतम गंभीरला संधी मिळण्याची शक्यता आहे.