कोलकाता : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकत चांगली सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका बसलाय. केकेआरमधील महत्त्वाचा क्रिकेटपटू जॉन हास्टिंग आयपीएलमधून बाहेर झालाय. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हंगामातील पहिल्या सामन्यात हास्टिंगने २.४ ओव्हर टाकताना चांगली कामगिरी केली होती. त्याने १६ बॉलमध्ये १३ डॉट बॉलसह दोन विकेट मिळवल्या होत्या.दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने करुण नायर आणि झहीर खानची विकेट घेतल्या होत्या. 


केकेआरचा संघ आज मोहालीत किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात जॉनची उणीव संघाला भासू शकते. हास्टिंगला सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. आयपीएलमध्ये खेळता न येणार असल्याने हास्टिंग ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.