नवी दिल्ली :  कोलकता नाईट राईडर्सचा कर्णधार गौतम गंभीर पुण्याविरूद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी जरा टेन्शनमध्ये आहे.  विजयाची लय कायम राखणे खूप अवघड आहे.  कोणत्याही ट्रेंडला सुरू कणे अवघड असते तसेच त्याला कायम ठेवणे आणखी अवघड असते, असे गंभीरने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही मापदंड निर्धारीत केले आहे. पण त्याला कायम ठेवणे गरजेचे आहे. आपण एका सामन्यात असे करू शकतो पण पाठीराख्यांना प्रत्येक सामन्यात असे करण्याची आशा असते. पण मला आशा आहे की चाहत्यांची ही आशा माझ्या संघाला समजू शकेल. याची सुरूवात माझ्यापासून झाली पाहिजे. 


गौतम गंभीरची नजर ही प्लेऑफवर असून तो दुसऱ्या टप्प्यातील कामगिरीवर आहे. पहिल्या टप्प्यात संघाने चांगली कामगिरी केली आहे. आता प्लेऑफ जाण्यापूर्वी आमच्याकडे सात सामने आहे.  हा टप्पा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.