आयपीएल २०१६ - प्लेऑफ ६ संघ, ३ सामने आणि जागा ४
इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामातील यापुढच्या लढती आता अटीतटीच्या होणार आहेत.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामातील यापुढच्या लढती आता अटीतटीच्या होणार आहेत. यंदा स्पर्धेत गेल्या हंगामातील विजेता संघ मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट हे संघ होते.
यातील पंजाब आणि पुणे हे दोन्ही संघ यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेलेत. या दोन्ही संघात आज सामना रंगणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकत स्पर्धेचा शेवट गोड कऱण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान आयपीएलच्या यंदाच्या प्लेऑफमध्ये कोणते ४ संघ खेळणार याचा निर्णय झालेला नाही.
प्लेऑफच्या स्पर्धेत सहा संघ आहेत. प्रत्येक संघ एकएक सामना खेळेल. म्हणजेच या सहा संघात तीन सामने होतील. यातील ज्या संघाची कामगिरी चांगली राहिल ते ४ संघ प्लेऑफमध्ये खेळतील.