बंगळुरु : ‘आयपीएल’मध्ये सध्या रंगत वाढत आहे. याचवेळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांना मोठा दंड ठोठावण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने खुर्चीला लाथ मारली. याप्रकरणी त्याला सामन्याच्या १५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच विराट कोहलीने सामन्यात षटके संपविण्यात वेळकाढूपणा केल्यामुळे २४ लाखांचा दंड आकारण्यात आलाय.


सामन्यात कोलकाताच्या सूर्यकुमार यादव याने विजयी चौकार लगावत संघाला रोमंचकारी विजय प्राप्त करून दिला. विजयाच्या उत्साहात गंभीरने डगआऊटमध्ये खुर्चीवर लाथ मारली आणि कॅमेरामध्ये ही दृश्ये कैद झाली. गंभीरवर आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप निश्चित करण्यात आलाय. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आलेय.


याआधीही कोहलीला बंगळुरूच्या गोलंदाजांनी धीम्या गतीने षटके टाकल्याने १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.