मुंबई : इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक अजब सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने आयपीएलचे सामने खेळवले जाऊ नये अशी मागणी असताना त्यांनी हा सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमुळे शेतकऱ्यांचे प्राण वाचवले जाऊ शकतात असे म्हणत त्यांनी आयपीएलचे समर्थन केले आहे.


मोदी यांच्या मते आयपीएलमुळे बीसीसीआयला जवळपास १००० कोटी रुपयांचा नफा होणार आहे. हा नफा दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवून त्यांना मदत केली जावी असे त्यांनी म्हटले आहे. '१००० कोटी दिल्याने बीसीसीआयमधील कोणाचाही जीव जाणार नाही, मात्र अनेक शेतकऱ्यांचे प्राण नक्की वाचतील,' असे त्यांनी म्हटले आहे.


आश्चर्य म्हणजे त्यांच्या या मागणीला आणि आवाहनाला अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.