बंगलोरमध्ये होणार आयपीएल फायनल
यंदाच्या आयपीएलची फायनल बैंगलोरच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई: यंदाच्या आयपीएलची फायनल बैंगलोरच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. तर क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटरची मॅच कोलकत्याच्या इडन गार्डनवर होणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे.
विशाखापट्टणम पुण्याचं होम ग्राऊंड
आम्ही मुंबई आणि पुण्याच्या टीमपुढे रायपूर, विशाखापट्टणम, कानपूर आणि जयपूर हे 4 पर्याय ठेवले होते, यापैकी पुण्यानं विशाखापट्टणमचा पर्याय स्विकारला, तर मुंबई याबाबत 17 तारखेपर्यंत निर्णय घेणार आहे, अशी प्रतिक्रिया राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
हायकोर्टानं केलं आयपीएलला आऊट
महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर घ्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यामुळे राजीव शुक्ला यांनी बैठक बोलावली होती.