नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले IPLचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधा MCAने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे एमसीएला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने २२ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे १ मे नंतर राज्यात आयपीएल सामने होणार नाही.


महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळवायला मनाई केली होती. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने १ मे रोजी पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवायला परवानगी दिली. एका दिवसात विशाखापट्टणमला सोय करणे कठीण आहे, असे म्हणत बीसीसीआयने १ मेचा सामना पुण्यामध्येच खेळण्याची परवानगी मागितली. न्यायालायने हा सामना पुण्यात खेळू देण्यास परवानगी दिली होती.