मुंबई : येथील वानखेडेवर आजपासून आयपीएलच्या ९ व्या सीझला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स आणि नवख्या पुणे यांच्यात सामना होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली पुणे मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधी लक्ष असणार आहे ते, अनंत मुकेश अंबानी यांच्याकडे. कारण वजन घटविल्यानंतर तो दिसतो कसा, हे पाहण्यासाठी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा चिरंजीव अनंत याने लठ्ठपणावर मात केलेय. मोठ्या मेहनतीने तब्बल ७० किलोने आपले वजन कमी केले आहे. अमेरिकी ट्रेनरच्या मदतीने अनंतने सुमारे ७० किलो वजन घटवले, असे सांगण्यात येत आहे.


अनंत याचा नवा लूक समोर आला. सोशल मीडियावर फोटो जोरात व्हायरल झाला आणि वजन घटविल्याचे चर्चा सुरु झाली. अनंतने तब्बल ७० किलो वजन कमी केलेय. अंबानींच्या मालकीची टीम मुंबई इंडियन्स. त्यामुळे नेहमीप्रमाणे अनंत मुकेश अंबानी सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येणार यात शंका नाही. त्यामुळे तो दिसतो कसा, याकडे लक्ष लागलेय. सध्या त्याचीच चर्चा जास्त आहे.