नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड एका विचित्र पेचात अडकण्याची शक्यता आहे. ज्यात राहुलला आयपीएल अथवा देश या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय एक नवा करार करण्याच्या तयारीत आहे. हा करार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार असणार आहे. १२ महिन्यांसाठीचा हा करार असेल. यातील नियमानुसार एक व्यक्ती दोन पदांवर एकाच वेळेस काम करु शकत नाही. 


भारतीय संघाची द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडवर भारत अ आणि अंडर-19 संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. त्यासोबतच राहुल दिल्ली डेअरडेविल्स संघाचाही मेंटर आहे. 


सध्या राहुलचा बीसीसीआयसोबत १० महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे तर दिल्ली डेअरडेविल्ससह २ महिन्यांचा करार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नव्या करारानुसार राहुलला आयपीएलचे मेंटरपद अथवा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद यापैकी एकाची निवड करावी लागू शकते.