मुंबई : दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयपीएल मॅचेस इतरत्र राज्याबाहेर खेळवण्यात याव्यात या संदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बीसीसीआय आणि फ्रेंचाईजी कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत. आयपीएल दरम्यान ६० लाख लीटर पाण्याची गरज भासणार आहे. अशा परिस्थिती राज्यात दुष्काळ असताना या मॅचेस राज्याबाहेर खेळवण्यात याव्यात, अशी मागणी एका संस्थेनं याचिकेद्वारे केलीय.


आयपीएल दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर इथं मिळून आणखी १९ मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळं आता कोर्ट काय निर्णय देतं यावर राज्यातील १९ आयपीएल मॅचेसचं भवितव्य अवलंबून असणार आहे.