मुंबई : इरफान पठाणला आयपीएल २०१७ साठीच्या लिलावात  कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. यामुळे ३२ वर्षीय पठाणही दुखावला आहे.इरफानने ट्विटरवर दु:ख शेअर केलं आहे. पठाणने चाहत्यांसाठी एक भावनिक मेसेज पोस्ट केला आहे. एवढंच नाही इरफानचे चाहते निराश झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान खानपेक्षा कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना संघांनी मोठी रक्कम देऊन खरेदी केलं. तर ५० लाख रुपयांची बेस प्राईस असलेला आयपीएल स्पेशालिस्ट अर्थात इरफान पठाणला कोणीही खरेदी केलं नाही. 


इरफान पठाणचा संदेश


' मी कोणतीही वेदना सहन करु शकतो, पण देशासाठी न खेळण्याची वेदना सहन करु शकत नाही', असं इरफान पठाणने म्हटलं आहे.


इरफान खानला २०१० मध्ये फ्रॅक्चर झालं होतं,  पाठीवर ५ शस्त्रक्रिया झाल्या, पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही, असं इरफानला फिजिओ म्हणत होते, पण, यानंतर पठाणचं पुनरागमन झालं, त्याने टीम इंडियामध्ये पुन्हा आपलं स्थान मिळवलं.


इरफानची उत्तम कामगिरी


वेस्ट झोनकडून खेळताना त्याने नॉर्थ झोनच्या शिखर धवन, युवराज सिंह आणि ऋषभ पंत यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. मागील आयपीएलमध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात होता. पण अनेक सामन्यांत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं नव्हतं. यानंतर मागील काही महिन्यांमध्ये इरफानने त्याच्या फिटनेसवर भर दिला होता. सैयद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमध्ये इरफान पठाणने अतिशय उत्तम कामगिरी केली होती.