मोहाली : भलेही भारतीय संघ विराट कोहलीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. मात्र यानंतर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला ऑस्ट्रेलियादरम्यानच्या सामन्यादरम्या मांसपेशीमध्ये दुखापत झाल्याने त्याला साजेसा खेळ करता आला नाही. युवराजला या सामन्यात २१ धावा करता आल्या. फॉकनरच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात तो वॉटसनकडे झेल देत बाद झाला. 


युवराजची दुखापतीबाबत अद्याप जास्त काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याची दुखापत गंभीर असल्यास वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळता येण्याची शक्यता कमी आहे. त्यासोबतच रैना, धवनचा फॉर्म ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही या तिघांना धोनी कायम ठेवणार की संघात बदल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.