नवी दिल्ली : चिकनगुनियाला तोंड दिल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये एन्ट्री झालीय. याच इशांतच्या आयुष्यात पुढच्या महिन्यात एक खास गोष्ट जुळून आलीय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 वर्षीय इशांत येत्या 9 डिसेंबर रोजी बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंग हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 


26 वर्षीय प्रतिमा ही पाच बहिणींपैकी एक... दिव्या, प्रशांती, आकांक्षा आणि प्रियांका अशा तिच्या चार बहिणींची नावं... तिचं कुटुंब 'बास्केटबॉल'साठी ओळखलं जातं. ती मूळची वाराणसीची... 


भारतीय बॉस्केटबॉल टीममध्ये प्रतिमानं आपला ठसा उमटवलाय. ती कोच म्हणून काम करतेय तर तिची बहिण प्रशांती इंडियन महिला टीमची कॅप्टन आहे.


इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंह यांचा साखरपुडा 19 जूनला झाला होता. 2011 मध्ये झालेल्या RIBA लिगला इशांतनं प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती लावली... त्यानंतरच प्रतिमासोबत त्याचा रोमान्स सुरू झाला, असं म्हटलं जातं. आता 9 डिसेंबरला या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.