पराभवनांतर धोनी भडकला, पिचवर साधला निशाणा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी चांगलाच भडकला. या पराभवासाठी त्याने खेळपट्टीला जबाबदार धरलेय. खेळपट्टीवर निशाणा साधताना या सामन्यातील विकेट या भारतीय नव्हत्या तर इंग्लिश विकेट असल्याचे त्याने म्हटले.
पुणे : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी चांगलाच भडकला. या पराभवासाठी त्याने खेळपट्टीला जबाबदार धरलेय. खेळपट्टीवर निशाणा साधताना या सामन्यातील विकेट या भारतीय नव्हत्या तर इंग्लिश विकेट असल्याचे त्याने म्हटले.
ज्या प्रमाणे गेल्या एक महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळताना जशा विकेट घेतल्या गेल्या होत्या त्याच्या तुलनेत या विकेट पूर्णपणे वेगळ्या होत्या. खेळपट्टी चेंडूला अधिक उसळी देणारी अशी वेगळीच होती. त्यामुळे आम्ही जसे मोठे शॉट खेळतो तसे खेळू शकलो नाही असे धोनी सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात म्हणाला.
ऑस्ट्रेलियात खेळल्यानंतर लगेचच भारतीय परिस्थितीशी जुळवून घेणे क्रिकेटपटूंना कठीण गेले का असे विचारले असता, या सामन्यात भारतीय परिस्थितीपेक्षा अधिक इंग्लिश परिस्थिती होती. या सामन्यात आणखी २५-३० धावा आम्ही केल्या असत्या तर सामना अधिक रंजक झाला असता, असे धोनी म्हणाला.