शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डींगला आला आणि मुंबईला जिंकवलं
तो शेवटचा बॉल ज्याने थ्रो केला
मुंबई : आयपीएल-१० चा कप मुंबई इंडियंसने जिंकल्यानंतर सगळ्यांनीच रोहित शर्मा आणि त्याच्या टीमचं कौतूक केलं. पण या टीममध्ये एक खेळाडू असा होता ज्यामुळे मुंबई इंडियंसने विजय मिळवला. या खेळाडूने काही क्षणाकरीता सगळ्यांच्याच मनात धास्ती आणली होती. कारण त्याच्या हातात तो शेवटचा बॉल आला होता. तो खेळाडू आहे २३ वर्षीय जगदीश सुचित.
पुण्याला जिंकण्यासाठी एका बॉलमध्ये ४ रन हवे होते. ३ रन जरी झाले असते तरी मॅच टाय झाली असती. संपूर्ण मैदानात शांतता होती. कोण जिंकेल हे कोणालाच सांगता येत नव्हतं. डेन क्रिस्चियन स्ट्राईकवर होता. शेवटच्या बॉल मिशेल जॉनसनच्या हातात होता. जॉनसनने शेवटचा बॉल टाकण्यासाठी धाव घेतली आणि लोकांच्या हद्याचे ठोके वाढू लागले. डेनने या शेवटच्या बॉलला डीप स्क्वेअर आणि मिडविकेटच्या मध्ये बाँड्रीच्या बाजुला मारला. पुणे ३ रन करुन मॅच टाय तरी करेल असं वाटलं पण जगदीशने काही सेंकदासाठी संपूर्ण खेळ जणू त्याच्याच हातात आणला होता.
एक रन पूर्ण झाल्यानंतर बॉल जगदीशच्या हातात आला. दूसरा रन पूर्ण होत असतांना जगदीश बॉल घेण्यासाठी वाकला. तिसरा रण पूर्ण होणारच होता पण जगदीशने बॉल सरळ विकेट किपरच्या हातात थ्रो केला आणि रन आऊट केला. पण तुम्हाला माहित नसेल की जगदीश हा फक्त शेवटच्या ओव्हरसाठी मैदानावर आला होता.
आपल्या जबरदस्त फिल्डिंगसाठी प्रसिद्ध जाँटी रोड्स हा मुंबईचा फिल्डिंग कोच आहे. त्याच्याच हा निर्णय होता की शेवटच्या ओव्हरमध्ये जगदीश सुचितला फिल्डिंगसाठी पाठवावं. त्याचा हा निर्णय मुंबईच्या पारड्यात पडला आणि मुंबईने फायनल जिंकली.