दहा वर्षानंतर भारतीय रेसलरनं जिंकली WWE
तब्बल १० वर्षानंतर एका भारतीयानं WWE चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं आहे.
मुंबई : तब्बल १० वर्षानंतर एका भारतीयानं WWE चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय वंशज असलेल्या जिंदर महलनं रविवारी रॅण्डी ऑर्टनला हरवून WWE चॅम्पियनशीप जिंकली आहे.
कॅनडाचा नागरिक असलेल्या जिंदर महल हा WWE चॅम्पियनशीप जिंकणारा दुसरा भारतीय बनला आहे. याआधी २००७मध्ये द ग्रेट खलीनं वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियनशीपवर कब्जा केला होता.
कॅनडाचा नागरिक असूनही मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. माझ्या भारतीय फॅन्सनं मला नेहमीच पाठिंबा दिला आहे, असं जिंदर या विजयानंतर म्हणाला आहे. रविवारी झालेली ही मॅच बघण्यासाठी मोठ्याप्रमाणावर प्रेक्षक आले होते. जिंदरनं रॅण्डी ऑर्टन सारख्या तगड्या स्पर्धकाला हरवल्यामुळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले होते.