मोहाली: किंग्ज इलेव्हन पंजाबनं रायजिंग पुणे सुपर जायट्ंसचा 6 विकेट्सनी पराभव करत, यंदाच्या आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहालीमध्ये झालेल्या या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन धोनीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आपल्या 20 ओव्हरमध्ये पुण्यानं 7 विकेट्स गमावून 152 रन केल्या. ओपनिंगला आलेल्या डुप्लेसिसनं 53 बॉलमध्ये 67 तर स्टीव्ह स्मिथनं 26 बॉलमध्ये 38 रन केल्या. पंजाबच्या मोहित शर्मानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 


153 रनचा पाठलाग करायला आलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली. मुरली विजय आणि मनन व्होरानं 97 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. या दोघांनीही हाफ सेंच्युरी झळकावली, तर ग्लेन मॅक्सवेलनं 14 बॉलमध्ये 32 रन करून पंजाबचा विजय निश्चित केला.