नवी दिल्ली : क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रैनाचे नाव आज दिग्गज खेळाडूंमध्ये घेतले जाते. रैना टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की रैनाच्या आयुष्यातही खूप वाईट दिवस होते. 


असे वाईट दिवस होते की त्यालाा आत्महत्या करावीशी वाटत होती. या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मला आत्महत्या करावीशी वाटली होती. 


कशामुळे करणार होता आत्महत्या


रैनाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या कोचचा लाडका होतो, त्यामुळे माझ्यासोबत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंना हे रूचत नव्हते. हॉस्टेलमधील खेळाडूंचा उद्देश चार वर्ष अभ्यास केल्यानंतर सर्टिफिकेट घेतल्यावर सरकारी नोकरीत जाणे हा होता. पण रैनाच्यामते तो त्यावेळी चांगले क्रिकेट खेळत होता. त्यामुळे लोक जळत होते. 


रैनाने सांगितले की एकदा त्याला हॉकी स्टिकने खूप मारले होते. इतके मारले की मी कोमामध्ये जाण्याच्या स्थितीत होतो. या रोजच्या त्रासला कंटाळून मला आत्महत्या करावीशी वाटली होती. 


लहानपणी झालेल्या त्रासातून उभारी घेत मी आता एक यशस्वी क्रिकेटर बनलो आहे, असे रैनाने सांगितले.