नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपते तेव्हा भारताचा विजय निश्चित असतो. मात्र कोहलीची बॅट केवळ धावाच करत नाही तर जबरदस्त कमाईही करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमाईमध्ये कोहली आणि धोनीची तुलना केली असता बक्कळ कमाई करण्यात कोहलीची बॅट पुढे आहे. कोहलीच्या बॅटवर एमआरएफचा लोगो आहे. या लोगोचे त्याला ८ कोटी मिळतात. तर धोनीच्या बॅटवर स्पार्टनचा स्टीकर आहे. धोनीला याचे सहा कोटी रुपये मिळतात. 


याव्यतिरिक्त कोहलीला कपडे आणि शूजच्या जाहिरातीसाठीही तब्बल दोन करोड रुपये मिळतात. बॅटवरील लोगोद्वारे कमाई करणाऱ्या अन्य क्रिकेटरर्समध्ये एबीडे विलियर्स(३.५ कोटी रुपये) व्यतिरिक्त शिखर धवन, रोहित शर्मा आणि क्रिस गेल ज्यांना प्रत्येकी तीन कोटी रुपये मिळतात.