मुंबई: आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारुण पराभव केला. या मॅचमध्ये धोनीनं आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये सिक्स मारून भारताला मॅच जिंकवून दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

50 ओव्हर असोत किंवा टी-20 धोनीनं आत्तापर्यंत बरेच वेळा फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही धोनीचा उल्लेख होतो. पण भारताचा बॅट्समन गौतम गंभीरला मात्र असं वाटत नाही. 


विराट कोहली हा खरा फिनिशर आहे, असं गंभीर म्हणाला आहे. सहा किंवा सात नंबरला बॅटिंगला येऊन मॅच संपवणाऱ्यालाच फिनिशर म्हणायचं असं काही नाही, ओपनिंगला येणारा बॅट्समनही फिनिशर असू शकतो, असं गंभीर म्हणाला आहे. 


गौतम गंभीरनं या शब्दांमध्ये विराट कोहलीचं कौतुक केलं असलं, तरी धोनी हाच जगातला सर्वोत्तम मॅच फिनिशर आहे, असं कोहली म्हणाला आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये धोनीनं फोर आणि सिक्सची बरसात करत भारताला मॅच जिंकवून दिली.