विशाखापट्टणम : प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मैदानामध्ये भडकलेला विराट कोहली आपण अनेकवेळा पाहिला असेल पण यावेळी मात्र कोहली चेतेश्वर पुजारावरच भडकला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं शानदार सेंच्युरी झळकवली.


या पार्टनरशीपवेळी विराट कोहली पुजारावर चांगलाच भडकला. रन धावताना दोघांमध्ये झालेल्या गोंधळामुळे कोहली चिडला. या रागावर कोहलीला ताबा मिळवता आला नाही आणि कॅमेरानं कोहलीची ही दृष्यं टिपली.


पाहा भडकलेल्या कोहलीचा व्हिडिओ