मुंबई : २००८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखील भारताने १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता. मोहम्मद कैफनंतर १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकणारा कोहली दुसरा कर्णधार ठरला होता. याच वर्षी कोहलीला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. सध्या कोहली भारताचा कर्णधार आहे. २००८मध्ये कोहलीसह इतर ५ क्रिकेटर्सनीही आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती. पाहा आत काय करतायत हे क्रिकेटपटू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मनोज तिवारी - ३१ वर्षीय मनोज तिवारीने २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्याची सुरुवात काही चांगली होऊ शकली नाही. तब्बल तीन वर्षानंतर त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. डिसेंबर २०११मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. २०१५मध्ये मनोज झिम्बाब्वेविरुद्ध अखेरचा खेळला होता.


 


युसुफ पठाण - २००७मध्ये युसुफने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा पहिला टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर पुढील वर्षी राजस्थान रॉयल्सला पहिले आयपीएलचे जेतेपद जिंकून देण्यात युसुफचे मोलाचे योगदान राहिले. २००८मध्ये त्याने पहिली वनडे खेळली. २००८ ते २०१२पर्यंतच्या कालावधीत त्याने भारतासाठी ५७ वनडेत प्रतिनिधित्व केले. मात्र कामगिरीत सातत्य राखता न आल्याने त्याला टीम इंडियात आपली जागा पक्की करता आली नाही. 



प्रग्यान ओझा - जून २००८मध्ये आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून सुरुवात करणाऱ्या प्रग्यान ओझाला जास्त काळ भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. ओझाने तिनही प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केलेय. 



मनप्रीत गोनी - पंजाबचा या स्पीडस्टारला २००८मध्ये भारतासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आशिया कपमध्ये त्याने हाँगकाँविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तीन दिवसांनी त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र तो सामना त्याचा शेवटचा ठरला. 



सुब्रमण्यम ब्रदीनाथ - ब्रदीनाथ आणि कोहलीने एकच मालिकेतून आंतरराष्ट्रीय करिअरची सुरवात केली होती. मात्र ब्रदीनाथला आंतरराष्ट्रीय स्तरावर तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो भारताकडून २ कसोटी, ७ वनडे आणि एक टी-२० सामना खेळलाय.