मुंबई : विराट कोहली हा भारतीय टीममधला सगळ्यात कंजूस खेळाडू असल्याचं वक्तव्य युवराज सिंगनं केलं आहे. रेडियो मिरचीला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराजनं भारतीय क्रिकेट टीमच्या दौऱ्याचे आणि ड्रेसिंग रुममधले रंजक किस्से सांगितले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीममध्ये बरेच कंजूस आहेत, यामध्ये काही ज्येष्ठ खेळाडूही आहेत, पण त्यांची नावं मी इथे घेऊ शकत नाही, असं युवराज म्हणाला आहे. दौऱ्याच्या वेळी विराटबरोबर शॉपिंगला गेल्यावर मी नेहमी पैसे देतो, पण त्यानंतर विराटकडे मला दिलेले पैसे सारखे मागावे लागतात, असं युवराज म्हणाला आहे. 


या मुलाखतीमध्ये युवराजनं आशिष नेहराचीही खिल्ली उडवली आहे. नेहराच्या लग्नानंतरचा किस्साही युवराजनं या मुलाखतीत सांगतिला आहे. आता माझं लग्न झालं आहे, माझ्यावर बायको आणि मुलांची जबाबदारी आहे, त्यामुळे मी जास्त खर्च करू शकत नाही असं नेहरा म्हणाल्याचं युवराजनं सांगितलं. 


ज्येष्ठ खेळाडूंमध्ये जवागल श्रीनाथ सगळ्यात जास्त कंजूस होता. इतके वर्ष एकत्र क्रिकेट खेळल्यानंतर श्रीनाथनं पहिल्यांदा मला पार्टी दिली ती पण डाळ भात, असा चिमटा युवराजनं काढला.