शिखर धवनला संधी, कोहलीचा गंभीरवर सर्जिकल स्ट्राईक
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं गौतम गंभीरऐवजी शिखर धवनला संधी दिली.
कोलकाता : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं गौतम गंभीरऐवजी शिखर धवनला संधी दिली. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये धवनला मात्र त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही.
खरतर या मॅचमध्ये कोहली गंभीरला संधी देईल असं बोललं जात होतं, पण कोहलीची पसंती धवनला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये धवन फक्त एक रन करून आऊट झाला. यावरून भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी धवनबरोबरच कॅप्टन कोहलीलाही टीकेचं लक्ष्य केलं आहे. ट्विटरवरून चाहत्यांनी कोहली आणि धवनला लक्ष्य केलं.
पाहा ट्विटरवरच्या निवडक प्रतिक्रिया