हैदराबाद: सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकता नाईट रायडर्सचा तब्बल 8 विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे. यामुळे हैदराबाद मात्र अजूनही यंदाच्या आयपीएलमध्ये विजयाच्या प्रतिक्षेमध्ये आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये हैदराबादचा पराभव झाला आहे. 


वॉर्नर- धवन अजूनही फॉर्मच्या प्रतिक्षेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून हैदराबादनं या मॅचमध्ये पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण त्यांचे ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन पुन्हा स्वस्तात आऊट झाले. त्यानंतर मॉर्गन आणि नमन ओझानं हैदराबादचा डाव सावरला. 


मॉर्गननं 43 बॉलमध्ये 51 तर ओझानं 28 बॉलमध्ये 37 रन करून हैदराबादला 141 रनपर्यंत पोहोचवलं. 


गंभीरला ऑरेंज कॅप


142 रनचा पाठलाग करायला आलेल्या कोलकत्याची सुरुवात चांगली झाली. ओपनिंगला आलेल्या गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पानं 92 रनची पार्टनरशीप केली. यात कॅप्टन गौतम गंभीरनं 60 बॉलमध्ये 90 तर उथप्पानं 34 बॉलमध्ये 38 रनचं योगदान दिलं. 


90 रन बनवणारा गौतम गंभीरलाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या  खेळीमुळे गंभीर यंदाच्या आयपीएलमधला सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू बनला आहे, त्यामुळे आता ऑरेंज कॅप गंभीरकडे आहे.