हरभजनच्या बाबा होण्यावर केआरकेची खिल्ली
क्रिकेटपटू हरभजन सिंग बाबा झाला आहे. हरभजनची बायको गीता बसरानं 27 जुलैला मुलीला जन्म दिला. यानंतर हरभजन आणि गीता बसराला सगळेच जणं शुभेच्छा देत आहेत. केआरकेनं मात्र ट्विटकरून हरभजनची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : क्रिकेटपटू हरभजन सिंग बाबा झाला आहे. हरभजनची बायको गीता बसरानं 27 जुलैला मुलीला जन्म दिला. यानंतर हरभजन आणि गीता बसराला सगळेच जणं शुभेच्छा देत आहेत. केआरकेनं मात्र ट्विटकरून हरभजनची खिल्ली उडवली आहे.
मागच्या वर्षी 29 ऑक्टोबरला हरभजनचं लग्न झालं आणि 28 जुलै 2016 म्हणजेच बरोबर नऊ महिन्यानंतर हरभजन बाबा झाला, याला म्हणातत खरं प्लॅनिंग असं ट्विट केआरकेनं केलं आहे.
याआधीही वादग्रस्त ट्विटमुळे केआरके चर्चेत आला होता. आलिया भटच्या बिकनीवर त्यानं अश्लिल ट्विट केलं होतं. तसंच नर्गिस फाकरी, सनी लियोनी यांच्याबाबतही त्यानं आक्षेपार्ह ट्विट्स केली होती. अशा वादग्रस्त ट्विटमुळे केआरके विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील रिझवान सिद्दीकींनी ही तक्रार दाखल केली आहे.