भारत सरकारचं अपील इंटरपोलकडून रद्द-ललित मोदी
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस पाठवलेली नाही.
मुंबई : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस पाठवलेली नाही. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचं भारत सरकारचं अपील इंटरपोलने रद्द केल्याचा दावा ललित मोदी यांनी केला आहे.
इंटरपोलच्या या निर्णयानंतर ललित मोदी हे आता कुठल्याही देशाचा दौरा करु शकतील. त्याचबरोबर त्यांच्यावर नजर ठेवता येणार नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.
इंटरपोलविषयीचा ललित मोदींचा हा दावा सत्य असेल, तर ललित मोदी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आयपीएल प्रकरणानंतर ललित मोदी हे भारताबाहेरच आहेत.