रिओ ऑलिम्पिक : ललिता बाबर 3000 मीटर स्टीपलचेसच्या फायनलमध्ये
अॅथलेटिक्समधील ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारातील भारताची ललिता बाबर फायनमध्ये पोहोचलीये. क्वालिफिकेशनच्या राऊंडमध्ये ललिता बाबरला चौथे स्थान मिळाले.
रिओ : साता-याची धावपटू ललिता बाबरनं रियो ऑलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीय. विशेष म्हणजे ललितानं प्राथमिक फेरीत राष्ट्रीय रेकॉर्ड मोडीत काढला.
प्राथमिक फेरीत तिनं 9 मिनिट19.76 सेकंदांची वेळ नोंदवली. ललितानं फायनलमध्ये धडक मारल्यानं तब्बल 32 वर्षांनी ऍथलेटिक्समध्ये फायनल गाठण्यात भारताला यश आलय.
आता ललिता बाबरची फायनल 15 ऑगस्टला रात्री 7.45वाजता होणार आहे. ललिता फायनलमध्ये मेडल पटकावून रिओमध्ये महाराष्ट्राचा पताका फडकावते का याकडेच आता तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलय.
यापूर्वी या क्रीडा प्रकारात भारताचा रेकॉर्ड सुधा सिंगच्या नावे होता. दरम्यान रियो ऑलिम्पिकमध्ये सुधा सिंगला काही चांगली कामगिरी करता आली नाही. ती प्राथमिक फेरीत नवव्या स्थानी राहिली.