कोलंबो : श्रीलंका क्रिकेट असोसिएशनने लसिथ मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा जलद गोलंदाज बोर्डाला कोणतीही माहिती न देता आयपीएलमधील मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा फास्टर बॉलर मलिंगाकडून याबाबत बोर्डाने उत्तर मागितलं आहे. मलिंगाला आयपीएलमध्ये परवानगी देण्यात आली नव्हती तरी  शुक्रवारी तो मुंबई इंडियन्स टीममध्ये ज्वॉईन झाला आणि सराव ही केला. 


मलिंगा आणि एसएलसीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आशिया कपपासून वाद सुरु आहे. मलिंगाला कर्णधार पद सोडण्यासाठी सांगितलं गेलं होतं त्यामुळे तो नाराज होता. मलिंगाचा टी-20 सामन्यासाठी टीममध्ये समावेश करण्यात आला पण त्याने फिटनेसचं कारण पुढे करत माघार घेतली.