पॅरिस : फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताच्या लिअँडर पेस आणि स्वित्झलँडची मार्टिना हिंगिस या जोडीनं विजय मिळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेस आणि हिंगिस जोडीचं मिश्र दुहेरीतलं हे तिसरं ग्रँड स्लॅम ठरलंय. पेस आणि हिंगिसने फायनलमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इव्हान डॉडिग या दुस-या मानांकित जोडीवर 4-6, 6-4, 10-8 अशी टायब्रेकरमध्ये मात केली.


पहिल्या सेटमध्ये सानिया-इव्हानने चांगला खेळ करत बाजी मारली. त्यानंतर मात्र पेस-हिंगिसने सलग दोन सेट जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.