मुंबई : सोशल नेटवर्किंग साईटवर एका रात्रीत स्टार झालेला अफगाणिस्तानचा, सहा वर्षीय मुर्तझा अहमदी अखेर आपला हिरो लिओनेल मेसीला भेटला. त्यानं मेसीला पाहिलेलं स्वप्न दुबईमध्ये साकार झालं. डोहामध्ये झालेल्या एका मैत्रीपूर्ण मॅचमध्ये मुर्तझा आणि मेसीची भेट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार्सिलोना आणि सौदी अरेबियाची अल अहिल या टीममधील मॅचमध्ये मुर्तझाला बॉल मैदानात आणण्याचा मान तर मिळालाच. शिवाय मुर्तझा आपला हिरो मेसीलाही घेऊन मैदानात आला. मेसीला भेटल्यानंतर मुर्तझाला आपला आनंद लपवता आला नाही. 


दरम्यान, मुर्तझाचा 10 नंबरची प्लास्टिकची जर्सी घातलेला फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झाला होता. आणि यानंतर मेसीच्या सगळ्यात मोठ्या फॅनचा शोध सुरु झाला होता. त्यानंतर हा मुलगा अफगाणिस्तानचा असल्याचं कळलं.