चेन्नई : तिस-या दिवसअखेर टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर पकड मजबूत केली आहे. तिस-या दिवसाच्या खेळाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारताचा ओपनर लोकेश राहुलची दमदार खेळी. लोकेशनं करियरमधली चौथी सेंच्युरी झळकावली. त्यानंतर त्यानं आपलं दीडशतकही पूर्ण केलं. आक्रमक आणि बहारदार खेळीमुळे लोकेश डबल सेंच्युरी पूर्ण करणार असं वाटत होतं. त्याचवेळी 199 रन्सवर तो आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

71 रन्सची खेळी करणारा पार्थिव पटेल आणि करियरची पहिली हाफसेंच्युरी झळकावणा-या करुण नायरची चांगली साथ लोकेशला लाभली. लोकेश राहुलची डबल सेंच्युरी अवघ्या 1 रननं हुकली. टेस्टमध्ये 199 रन्सवर आऊट होणारा लोकेश हा नववा बॅट्समन ठरला आहे.


१९९ रनवर आऊट होणारे खेळाडू


मुदस्सर नजर (पाकिस्तान) वि. भारत ऑक्टोबर 1984
मोहम्मद अजहर (भारत) वि. श्रीलंका डिसेंबर 1984
एम. एलियट (ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड जुलै 1997
सनथ जयसूर्या (श्रीलंका) वि. भारत ऑगस्ट 1997
स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया) वि. वेस्टइंडीज मार्च 1999
यूनुस खान (पाक) वि. भारत जानेवारी 2006
इयान बेल (इंग्लैंड) वि. द. आफ्रिका जुलै 2008
स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया) वि. वेस्टइंडिज जून 2015
केएल राहुल (भारत) वि. इंग्लंड डिसेंबर 2016