मुंबई : मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे. महेला जयवर्धने रिकी पॉटिंगची जागा घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयवर्धनेच्या आधी पॉटिंग हा तब्बल चार सिझन मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक होता. पॉटिंग प्रशिक्षक असताना मुंबईनं दोन वेळा आयपीएल जिंकली होती. मागच्या सिझनमध्ये मात्र मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली होती.


मुंबई इंडियन्सना पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आणण्याचं आवाहन महेला जयवर्धने पुढे असणार आहे. 2015च्या वर्ल्डकपनंतर जयवर्धनेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.