video : जेव्हा धोनी अंपायरवर भडकतो
भारतीय संघाचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या शांत स्वभावासाठी प्रचलित आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका मॅचमध्ये अंपायर्सनी निर्णय बदलल्यानंतर धोनीचे रौद्ररुप पाहायला मिळाले. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
मुंबई : भारतीय संघाचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या शांत स्वभावासाठी प्रचलित आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका मॅचमध्ये अंपायर्सनी निर्णय बदलल्यानंतर धोनीचे रौद्ररुप पाहायला मिळाले. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्यादरम्यान हे घडले. सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर धोनीने मायकेल हसीला स्टंप आऊट केले. त्यावेळी थर्ड अंपायरने बाद असा निर्णय़ दिला. मात्र फिल्ड अंपार्यसनी हा निर्णय बदलला. त्यानंतर धोनी फिल्ड अंपायर बिल बाउडेन यांच्याशी बातचीत करण्यास गेला.
अंपायर्सनी निर्णय बदलल्याने धोनी चांगलाच रागावला होता. थर्ड अंपायरचा निर्णय कसा काय बदलला जाऊ शकतो हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत होता.
त्यानंतर अंपायर बिली यांनी धोनीला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. खरतरं टीव्ही स्क्रीनवर चुकून आऊट असे फ्लॅश झाले होते. जेव्हा फिल्ड अंपायरला ही गोष्ट कळली तेव्हा अंपायरने मायकेल हसीला पुन्हा बोलावले. संपूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर धोनीचा राग शांत झाला.