मोहाली : पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. पण भारतासमोर एक मोठं संकट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे ५ पैकी ४ बॅट्समनची कामगिरी अजूनही चिंताजनक आहे. कर्णधार धोनी पुढे या ४ खेळाडूंचं मोठं आव्हान असणार आहे. ओपनिंग करणारे रोहित शर्मा आणि धवन यांच्यावर आता एवढा विश्वास राहिलेला नाही. रोहितने ३ मॅचमध्ये फक्त ३३ रन तर धवनने ३ मॅचमध्ये फक्त ३० रन केले आहेत.


सुरेश रैना आणि युवराज सिंग यांची कामगिरी देखील काही एवढी चांगली नाही आहे. विराट कोहली सोडून सुरुवातीच्या ५ पैकी ४ बॅट्समन कडून चांगल्या कामगिरीची आज अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाकडे चांगले बॅट्समन आहेत. भारताकडे पण आहेत पण त्यांचं फॉर्ममध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे.


स्पिन बॉलिंग ही एकेकाळी भारतासाठी रन बनवण्यासाठी अधिक चांगली मानली जायची पण भारतीय बॅट्समन स्पिन विरोधातच विकेट टाकतांना दिसत आहे. खराब बॉलवर ही भारतीय बॅट्समनने खूप कमी रन्स काढले. त्यामुळे आस्ट्रेलिया विरोधात भारतीय खेळाडूंनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असणार आहे.