मुंबई : कोलकाता नाईट राइडर्सला शनिवारी मोठा झटका बसला. मनीष पांडे हा कांजण्यामुळे रविवारी होणाऱ्या राइजिंग पुणे सुपर जायंट्सच्या विरोधातील मॅचमध्ये खेळतांना दिसणार नाही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीष पांडे हा शुक्रवार पासूनच अस्वस्थ होता. त्याला कांजण्या आल्यामुळे तो सध्या टीमसोबत नाही आहे. तो काही काळ टीममधून बाहेर राहणार आहे. अशी माहिती केकेआरच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.


२६ वर्षीय या खेळाडूने ३ नंबरवर खेळत मुंबई विरोधात २९ बॉलमध्ये ५२ रन ठोकले होते. त्यामुळे एक धडाकेबाज खेळाडू बाहेर गेल्याने टीम थोडी चिंतेत आली आहे.