कोलकता :  अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेश सरकारनं भारत-पाकिस्तान मॅचला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यास नकार दिल्यानं धर्मशालेत आयोजित होणारी मॅच आता कोलकात्याला खेळवली जाणार आहे. 


टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच नियोजित मॅचचं ठिकाण बदलण्याची घटना घडलीय. धर्मशालेत होणा-या भारत-पाकिस्तान लढतीवरुन चांगलंच राजकारण रंगलं होतं. 


हिमाचल सरकारच्या आडमुड्या भुमिकेमुळेच मॅचचं ठिकाण बदलावं लागलं असून बीसीसीआयनं याबाबत निराशा व्यक्त केलीय. दरम्यान फॅन्सला त्यांच्या तिकीटांचे पैसे परत केले जातील किंवा कोलकाता मॅचसाठीदेखील धर्मशालेतील तिकीट चालेल अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आलीय. 


भारत-पाकिस्तान मॅच ही त्याच दिवशी म्हणजे 19 मार्चला संध्याकाळी 7.30वाजता खेळली जाईल.