गौतम गंभीरच्या पुनरागमनाचे संकेत
अष्टपैलू फलंदाज गौतम गंभीरनेही त्याच्या फॉर्मने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबई : अष्टपैलू फलंदाज गौतम गंभीरनेही त्याच्या फॉर्मने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे गौतम गंभीर टीम इंडियात परतेल, अशी चिन्हं दिसून येत आहेत. गौतम गंभीर २ वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात 2-0 असा विजय साजरा केल्यानंतर टीम इंडियात मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र काही खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता संघात त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड उद्या केली जाणार आहे. त्यासाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक उद्या सकाळी मुंबईत होणार आहे.