मुंबई : अमेरिकेत झालेल्या पहिल्या टी-20मध्ये स्टुअर्ट बिनीच्या एका ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी 32 रन केल्या, यामध्ये तब्बल 5 सिक्सचा समावेश होता. यावरुन सोशल नेटवर्किंगवरून स्टुअर्ट बिनी आणि त्याची बायको मयंती लँगरला लक्ष्य करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयंती लँगरनं या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटरवर मयंतीनं याबाबतचं ट्विट केलं आहे. मला आत्महत्या करायला सांगणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. असे विनोद करण्याआधी ज्यानं आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबाचा विचार करा. मला घटस्फोट घ्यायला सांगणाऱ्यांना आयुष्यात प्रेम मिळालं नसेल, ते लवकर मिळो, असं मयंती म्हणाली आहे. 


18 वर्षांची असल्यापासून मी कामाला सुरुवात केली. माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्हीही नोकरीचं बघा आणि स्वत: आणि कुटुंबाला मदत करा, असं प्रत्युत्तर मयंतीनं दिलं आहे. 


पाहा काय म्हणाली मयंती लँगर